“महिला आणि मुलींची सुरक्षितता ही जळगाव पोलीस दलाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या सुरक्षेसाठी जळगाव जिल्हा पोलीस दल सदैव तत्पर आहे.
महिलांनी व मुलींनी कोणत्याही प्रकारच्या छेडछाडीला किंवा त्रासाला घाबरून न जाता निर्भयपणे पुढे येऊन तक्रार करावी. अशा घटनांना आळा घालण्यासाठी दामिनी पथक कार्यरत आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ वर संपर्क साधा. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येकाने जागरूक राहून पोलीस दलाला सहकार्य करावे.
लक्षात ठेवा, महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित!
— जळगाव जिल्हा पोलीस 🚔
3.9k views | Jalgaon, Maharashtra | Oct 17, 2026