सायबर गुन्हेगारांच्या ‘म्युल बँक अकाऊंट्स’वर कोल्हापूर सायबर पोलिसांचा मास्टर स्ट्रोक! 💳🚔
सायबर फसवणुकीतील रक्कम वळवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘म्युल बँक अकाऊंट्स’च्या साखळीवर कोल्हापूर सायबर पोलिसांनी निर्णायक कारवाई केली आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशानुसार सायबर पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व त्यांच्या पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे कारवाई करत शाहूपुरी परिसरातील एका कार्यालयावर धडक दिली.
म्युल अकाऊंट्स उपलब्धच होऊ दिले नाहीत, तर सायबर फसवणुकीची आर्थिक साखळी खंडित करता येते, या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
🔴 महत्त्वाचे आवाहन:
तुमचे बँक खाते कोणालाही भाड्याने किंवा कमिशनवर देऊ नका.
तुमचे खाते सायबर गुन्ह्यात वापरले गेल्यास तुम्हीही कायदेशीर अडचणीत येऊ शकता.
#KolhapurPolice #CyberPolice #CyberCrime #CyberFraud #MuleAccount #CyberSafety #OnlineFraud #Kolhapur
21 views | Kolhapur, Maharashtra | Sep 4, 2026