जाफराबाद: सिपोरा परिसरात बैलजोडीच्या माध्यमातून शेतकरी करत आहे खरीप पेरणी
आज दिनांक 6 जुलै 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या स्मरास जाफराबाद तालुक्यातील सिपोरा गावासह तालुक्यात बळीराजा खरीप पेरणी करताना पाहायला मिळत आहे या घरी पेरणीची विशेष बाब म्हणजे बळीराजा बैलांच्या माध्यमातून ही पेरणी करत आहे, कारण सध्या ट्रॅक्टर साठी लागणारे डिझेल महागडे आहे आणि त्यात ट्रॅक्टर मिळणे ही शेतकऱ्यांसाठी अवघड झाले आहे, त्यामुळे बळीराजा पुन्हा बैलजोडीची शेती मशागत करत खरीप पेरणी करत असल्याचे तालुक्यात पाहायला मिळत आहे.