समुद्रपूर: गिरड येथील चोरविरा आणि चुरीमजरा शिवारात वाघाच्या हल्ल्यात एक बैल आणि एक कालवड ठार, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गिरड :परीसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ मचविला असुन एकाच दिवशी एक कालवड व एका बैलावर हल्ला करीत ठार केले. प्राप्त माहितीनुसार वाघाने पुन्हा चोरविरा शिवारात प्रवेश करीत राजु भास्कर तेलरांधे यांच्या ६० हजार रुपये किमतीच्या बैलाचा फडशा पाडला तर नारायण तेलरांधे यांच्या १० हजार रुपये किमतीच्या कालवडी हल्ला चढवित ठार केले घटनेची माहिती मिळताच वनपरीश्रेत्र अधिकारी निलेश गावंडे त्यांच्या आदेशाने पंचनामा करण्यात आला आहे.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ योगेश राघोर्तै यांनी शवविच्छेदन केले.