समुद्रपूर: गिरड ग्रामीण सहकारी पत संस्थेची विनाकारण बदनामी करणाऱ्यांवर अब्रृ नुकसानीचा दावा करणार: अध्यक्ष तुषार गिरडे
गिरड ग्रामीण सहकारी पत संस्था हि गेल्या २७ वर्षापांसून नियमित सुरू असुन या संस्थेने तालुक्यातील प्रत्येक नागरीकांचा विश्वास संपादन केले आहे.मात्र ५ वर्षापुर्वी धनराज बावणे यांनी पत संस्थेकडे ५० हजार रुपये कर्जाची मागणी केली होती. संस्थेच्या संचालक मंडळाने कर्ज मंजूर करुन बावणे यांना कर्जाचा फार्म देऊन कागदपत्रांची पुर्तता करण्याचे सांगितले धनराज बावणे याने घराच्या आठवर ग्रामपंचायत इकडून बोझा जळविला मात्र कर्जाची उचल केले नाही. व आता गिरड ग्रामीण सहकारी पत संस्थेची बदनामी करीत आहे.