धुळे: इंदिरानगर वाडी भोकर रोड परिसरातून अल्पवयीन मुलाचे अपहरण, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 28, 2024 धुळे शहरातील इंदिरानगर वाडीभोकर रोड परिसरात एका अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. 16 वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कोणत्यातरी अज्ञात कारणासाठी फूस लवून पळवून नेले आहे. हा मुलगा शिक्षण घेत आहे. ही घटना लक्षात येत नातेवाईकांनी या मुलाच्या सर्वत्र शोध घेतला असता हा मुलगा आतापर्यंत मिळून न आल्याने मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.