धुळे: काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयाबाहेरील अनधिकृत बांधकाम हटवा: लोकजनशक्ती पार्टीचा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Dhule, Dhule | Aug 28, 2024 काकासाहेब बर्वे कन्या छात्रालयाच्या परिसरात बांधलेले अनधिकृत शॉपिंग सेंटरबाबत लोकजनशक्ती पार्टीने धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांना निवेदन देऊन गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. पार्टीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर येत्या पंधरा दिवसांत हे बांधकाम हटवले नाही तर ते आमरण उपोषणास सुरुवात करेल. यावेळी पार्टीच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.