धुळे: व्यापारीची साक्री रोड परिसरात दुचाकीतून सव्वा लाख रुपयांची रोकड लंपास, धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Aug 28, 2024 धुळे शहरातील साक्रीरोडवरील झुलेलाल सोसायटीत राहणारे व्यापारी दिलीप भजनलाल दंडवाणी यांच्याशी एक धक्कादायक घटना घडली आहे. साक्री रोड परिसरात बँकेतून काढलेली सव्वा लाख रुपयांची रोकड त्यांच्या गाडीच्या डिक्कीतून चोरट्यांनी लंपास केली. दंडवाणी यांनी कुमारनगर येथील सिंचन भवन शेजारील कॅनरा बँकेतून रोकड काढून ती त्यांच्या अॅक्टीव्हा गाडीत ठेवली. नंतर ते जवळच असलेल्या बाबा जोगतराम दरबार येथे दर्शनासाठी गेले. याच दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी त्यांची गाडी निशाणा बनवत डिक्कीतील रोकड चोरून नेली.