पेण: पेण शहरामध्ये 14 इमारती धोकादायक
Pen, Raigad | Jun 5, 2026 यंदाच्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीत आणि अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये या दृष्टिकोनातून पेण पालिकेने शहरातील नोंदणीकृत इमारतींचा आढावा घेतला. या आढाव्यामध्ये पेण शहरातील 14 इमारती या अत्यंत धोकादायक म्हणून निष्पन्न झाल्या असून जवळपास 37 इमारतींची धोकादायक इमारती म्हणून नोंद करण्यात आली आहे. सदर इमारतींच्या अध्यक्ष, सोसायटी किंवा मालकांना तशा प्रकारच्या नोटीस जारी करण्यात आल्या आहेत.