भोकरदन: धावडा येथे भव्य सजावट करत बैलगाडी सोबत घेत काढण्यात आली भव्य तिरंगा रॅली
आज दिनांक 14 ऑगस्ट 2025 वार गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता भोकरदन तालुक्यातील धावडा या गावांमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन जिल्हा परिषद शाळेच्या वतीने करण्यात आले होते याप्रसंगी शेतकऱ्याची प्रतिकारक बैलगाडी सजवत ही तिरंगा रॅली आज धावडा नगरीमध्ये ढोल ताशाच्या गजरात काढली होती यावेळी गावातील सर्व नागरिकांनी या तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता या तिरंगा रॅलीने संपूर्ण धावडा गाव परिसर दणाणून गेले होते.