🏘️ ऑपरेशन थंडर 2.0 | जनसहभागातून नशामुक्त समाजाकडे वाटचाल
मा. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन थंडर 2.0 अंतर्गत पोलीस ठाणे पाचपावलीच्या वतीने सिद्धार्थ नगर, टेका येथील तथागत बुद्ध विहार येथे नागरिक, महिला, युवक, लहान मुले, स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिकांची जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली.
बैठकीत अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच कुटुंब आणि समाजाला व्यसनमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व मते जाणून घेण्यात आली. सुमारे 150 ते 200 नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नशामुक्त नागपूरच्या संकल्पाला बळ दिले.
🤝 जनतेचा सहभाग – नशाविरोधी लढ्याची खरी ताकद!
#OperationThunder2_0 #DrugFreeNagpur #SayNoToDrugs #NagpurPolice #antidrugsweek
16 views | Nagpur, Maharashtra | Jun 22, 2026