जाफराबाद: टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी यांनी दिली भेट
आज दिनांक 26 मे 2026 वार मंगळवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे जालना जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे भेट दिली आहे, याप्रसंगी त्यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचा कामकाजाचा आढावा घेतला आहे तसेच यावेळी गावकऱ्यांच्या वतीने व टेंभुर्णी पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला ,यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.नितीन कटेकर इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.