जाफराबाद: जेवखेडा पाटी येथे टू व्हीलर चा भीषण अपघात, 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
आज दिनांक 17 एप्रिल 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील जवखेडा पाटी येथे दिनांक 16 एप्रिल च्या मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात होऊन 25 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातामध्ये गोंधळ खेडा येथील अक्षय समाधान गिरी याचा जागीच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळतात त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असून पुढील तपास करत आहेत.