पेण: सर्वसामान्यांच्या शिक्षणासाठी जि.प.शाळा टिकवा; इंदुरीकर महाराज यांचे प्रतिपादन
Pen, Raigad | Jun 4, 2026 सामान्य घरातील मुलाबाळांचा विचार करताना आणि त्यांच्या घरातील आर्थिक परिस्थितीचा विचार करून शासनाच्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकून राहिल्या पाहिजेत, तरच तळागाळातील गोरगरीब विद्यार्थी योग्य शिक्षण घेऊ शकेल असे प्रतिपादन ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती इंदुरीकर महाराज यांनी केले. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे भव्य जाहीर कीर्तन पेण पूर्व विभागातील वाकरूळ येथील वाकेश्वर मंदिर परिसरातील विस्तीर्ण मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.