अंबरनाथ: अंबरनाथ येथील प्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या हुतात्मा चौक येथील घरावर गोळीबार
अंबरनाथ येथील प्रसिद्ध उद्योगपती विश्वनाथ पनवेलकर यांच्या हुतात्मा चौक येथील निवासस्थानाच्या दिशेने दोन अज्ञात हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन गोळीबार केल्याची घटना घडली आहे. अज्ञात हल्लेखोर आणि दुचाकीवरून येऊन घराच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. घडलेल्या प्रकरणानंतर परिसरामध्ये सुरक्षित वाढ करण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास घेत आहेत. गोळीबार करण्यामागचा हेतू काय होता हे देखील अद्याप पर्यंत स्पष्ट झाले नाही.