अंबरनाथ: नागरिकांनी स्वतःची सुरक्षा आधी करावी : बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मालवणकर
सध्या शाळेतल्या मुलांना उन्हाळ्यातल्या सुट्ट्या लागल्या आहेत आणि पुढच्या आठवड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यामुळे नागरिक बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी बाहेर पडतात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मूळ गावी जातात. त्या पार्श्वभूमीवर बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण मालवणकर यांनी नागरिकांना आज दिनांक १० एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास आवाहन केलं आहे.