अंबरनाथ: अंबरनाथ मधील भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयाची अज्ञात हल्लेखोरांकडून तलवारीने तोडफोड, घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल
अंबरनाथ पूर्व परिसरातील बीकेबीन रोडवरील भाजपचे माजी नगरसेवक रोहित महाडिक यांचे कार्यालय आहे. त्या कार्यालयाची शनिवारी रात्री दहा ते बारा अज्ञात हल्लेखोराने हातामध्ये तलवारी घेऊन येऊन तलवारीने ऑफिसची तोडफोड केली तसेच ऑफिस मधील तरुणांवर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही सेकंदातच हल्लेखोर पसार झाले. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला असून पोलीस शोध घेत आहेत. मात्र घटनेचा हा सर्व थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल होत आहे