अंबरनाथ: कर्जत बदलापूर रोडवर बदलापूर नगर परिषदेची अतिक्रमणावर कारवाई
आज दिनांक 9 एप्रिल रोजी दुपारी 1 च्या सुमारास कर्जत बदलापूर रोडवर अनधिकृत गाळ्यांवर नगर परिषदेने तोडक कारवाई केली आहे. यावेळी अनधिकृत गळ्यांमधील मालमत्तेचे नुकसान होऊ नये म्हणून बदलापूर नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी मारुती गायकवाड यांनी दुकानदारांना दुकानातील साहित्य काढण्याची संधी दिली आहे. नगरपरिषदेचा हातोडा या अनधिकृत गाळ्यांवर पडणार म्हणून दुकानदारांची दुकानातील साहित्य काढण्यासाठी घाई झालेली पाहायला मिळाली.