पुण्यात थरारक क्षण..! ऑटोची वाट पाहणाऱ्या दोन तरुणींच्या अंगावर कोसळले झाड; CCTV मध्ये कैद झाला जीव वाचल्याचा क्षण...
पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौक परिसरात ऑटोची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन तरुणींच्या अंगावर अचानक मोठे झाड कोसळल्याची थरारक घटना घडली.
सुदैवाने, दोघींनी प्रसंगावधान राखत क्षणार्धात बाजूला धाव घेतल्यामुळे त्यांचे प्राण वाचले. या दुर्घटनेत एक ऑटोही झाडाखाली दबला गेला, मात्र चालक सुखरूप बचावला.
संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पावसाळ्यात धोकादायक झाडांची तातडीने तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
व्हिडिओ 🎥 : महाव्हाईस न्यूज डेस्क
#Pune #TreeFall #CCTV #Maharashtra #ViralVideo #RoadSafety #Monsoon #PuneNews #LatestNews