महाराष्ट्रातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीला हिरवा कंदील, पण प्रत्यक्षात फक्त 9 हजार पदेच भरली जाणार?
राज्य सरकारने 11 ऑगस्ट 2026 रोजी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवरील बंदी उठवली, मात्र 35,029 मंजूर पदांपैकी केवळ सुमारे 9,000 पदे भरली जाण्याची शक्यता आहे.
नव्या संचमान्यतेनुसार जवळपास 25% पदे अतिरिक्त ठरली असून, सुमारे 50% पदांवर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे भरतीसाठी केवळ 25% पदे उपलब्ध राहणार आहेत.
या भरतीमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, ग्रंथपाल आणि प्रयोगशाळा सहाय्यक यांसारख्या महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे.
दरम्यान, भरती प्रक्रियेच्या संथ अंमलबजावणीवर शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी नाराजी व्यक्त केली असून, प्रक्रिया तातडीने सुरू न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
👉 नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेण्यासाठी स्लाइड्स स्वाइप करा.
📲 अशाच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी Times of Maharashtra फॉलो करा.
#Maharashtra #MaharashtraNews #MaharashtraRecruitment #Recruitment #GovernmentJobs #GovtJobs #NonTeachingStaff #EducationNews #MaharashtraEducation #SchoolRecruitment #ClerkRecruitment #LibrarianRecruitment #LabAssistant #GovernmentRecruitment #JobNews #मराठीबातम्या #महाराष्ट्र #महाराष्ट्रबातम्या #शिक्षकेतरभरती #सरकारीभरती #शिक्षणविभाग #नोकरीबातम्या #भरती #शिक्षणबातमी #TimesOfMaharashtra