पोलादपूर: पोलादपुरात दुचाकी स्लिप झाल्याने तरुण गंभीर जखमी
पोलादपूर शहरातील सर्विस रोडवर दुचाकी स्लिप होऊन तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगलमूर्ती पार्क एचडीएफसी बँकेसमोर बुधवार रोजी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की जय धोंडू कदम रा. महालगुर हा कामानिमित्त एक्टिवा दुचाकी घेऊन सर्विस रोड वरून जात असता दुचाकी स्लिप झाल्याने तरुण डिव्हायडर वर आढळून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला आहे. या घटनेची माहिती समजतात पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद रावडे, पोलीस हवलदार संदीप कदम आणि पोलीस कर्मचारी व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी तरुणाला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.