मनःपूर्वक धन्यवाद मा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे सर…! 🙏🏻
सरांशी माझी मागची भेट झाली होती, त्यावेळी सतीश आगाशे सर यांच्या माध्यमातून मला सरांना माझे डिजिटल पोर्ट्रेट भेट देण्याचा योग आला होता. ते पोर्ट्रेट पाहून सरांनी अगदी मनापासून त्याचे कौतुक केले होते. त्या भेटीनंतर सरांशी एक अतिशय छान संवाद निर्माण झाला.
माझ्या आयुष्यात काही नवीन घडलं, एखादं यश मिळालं किंवा एखादी आनंदाची गोष्ट घडली की मी आवर्जून सरांना मेसेज करून सांगतो. त्याच एका संवादात सरांनी अगदी आवर्जून सांगितलं होतं—
“ठाण्यात येणार असाल तर जरूर भेटा.”
यावेळी मुंबईला जाण्यापूर्वी मी सरांना मेसेज केला आणि त्यांनी वेळ दिली. त्यामुळे थेट ठाणे पोलीस आयुक्तालयात सरांची भेट घेण्याचा योग आला.
मी पोहोचलो तेव्हा सरांचं काम सुरू होतं. मी शांतपणे बसून ते सगळं पाहत होतो…
सरांचं काम ज्या वेगाने आणि शिस्तीने सुरू होतं, तो सगळा अनुभव माझ्यासाठी खूप वेगळा होता. एका पोलीस आयुक्तांचं काम किती मोठं असतं, किती जबाबदाऱ्या असतात आणि त्यांचं वेळापत्रक किती व्यस्त असतं, हे पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवत होतो.
सगळी कामं आटोपल्यानंतर सरांनी बाहेर सांगितलं,
“आता कोणालाही मध्ये सोडू नका.”
आणि मग माझ्याकडे पाहून म्हणाले,
“या प्रणवजी…”
तोपर्यंत साधारण ७.३० वाजले होते. त्यानंतर पुढचे बराच वेळ सरांसोबत मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. ❤️
निघताना सरांनी मला म्हटलं,
“प्रणवजी, मी तुम्हाला एका खास कामासाठी बोलावलं होतं.”
आणि माझ्या हातात त्यांनी एक Appreciation Letter दिलं…
तो क्षण खरंच अविस्मरणीय होता. काही क्षण मला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. माझ्या कामाची, माझ्या कलेची दखल घेऊन मिळालेली ही पाठीवरची थाप माझ्यासाठी खूप मोठी आहे.
ठाणे पोलीस आणि मा. आशुतोष डुंबरे सर, तुम्ही खरंच ग्रेट आहात! ❤️🙏🏻
माझ्यासारख्या एका छोट्या कलाकारासाठी हा खूप मोठा सन्मान आहे. या प्रेमासाठी, प्रोत्साहनासाठी आणि विश्वासासाठी सरांचे मनःपूर्वक आभार!
ही आठवण कायम जपून ठेवणार… आणि ही कौतुकाची थाप कायमच प्रेरणा देणारी असणार आहे ❤️🙏🏻
धावपळीच्या या भेटीत महाराष्ट्र महिला मोर्चा सचिव Mrunal Pendse ताईंची भेट झाली, याचाही खूप आनंद झाला. पुढच्या वेळी नक्की निवांत भेटूया. आणि हो… फोटो राहिला आहे! 😁
मनःपूर्वक धन्यवाद सर…!
आपली ही पाठीवरची थाप पुढच्या प्रवासासाठी नक्कीच मोठी प्रेरणा आहे. 🙏🏻
- प्रणव चंद्रशेखर सातभाई
077448 83529
.
Ashutosh Dumbare #thanenews #digitalart #digitalportraitbypranav #ThanePoliceCommissionerate
Thane, Maharashtra | Oct 7, 2026