शहरातील केटी नगर, सुरेंद्रगड परिसरात एका घरात कुलरमध्ये साप शिरल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र, प्रसिद्ध वाईल्डलाईफ रेस्क्यूअर शुभम जी.आर. यांनी अत्यंत धाडसाने या सापाचे यशस्वी रेस्क्यू केले.सुरेंद्रगड येथील शुक्ला परिवाराच्या घरात रात्रीच्या अंधारात एक साप कुलरमध्ये शिरताना दिसला. कुलरमध्ये अचानक साप दिसल्याने कुटुंबाची पाचावर धारण बसली आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले. बघ्यांची मोठी गर्दीही तिथे जमा झाली होती.