20 फेब्रुवारीला दुपारी 5 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत कुख्यात तस्कर अब्दुल वहीद उर्फ खोका याला अटक केली आहे. आरोपीकडून ७५ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. आरोपी झिंगाबाई टाकली येथील आपल्या सासरच्या घरी लपून राहत होता. तिथेच त्याने गांजाचा साठा केला होता.अब्दुल वहीद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हत्या, खंडणी आणि तस्करीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहे.तो संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या अफसर अंडा याचा जवळचा साथीदार आहे. टोळीत वाद