गस्तीवर असलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला!सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; गंभिर
पारशि गस्तीवर असलेल्या वनमजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला! सागवान लाकडाची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल; वनमजूर गंभीर जखमी वनविभागाच्या गस्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालत सागवान लाकूड घेऊन जाणाऱ्या एका व्यक्तीने वनमजुरावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ७.१५ वाजताच्या सुमारास मौजा सतरापूर शिवारात घडली. या हल्ल्यात वनमजूर एकनाथ जागो भोयर (वय ५६) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रामटेक पोलिसांनी आरोपी प्रकाश परतेती याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण करणे व जीवे मारण्याची धमकी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. गस्तीवेळी सागवान लाकूड नेताना आढळला आरोपी मिळालेल्या माहितीनुसार, वनरक्षक स्वप्नील राजेंद्र चौधरी (वय ३१,