लातूर: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना अर्जदारांच्या पहिल्या यादीच्या चावडी वाचनाची कार्यवाही पूर्ण, आक्षेपावर कारवाई
Latur, Latur | Jul 13, 2024 लातूर,-जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज भरून घेण्याची कार्यवाही गतीने सुरु असून या योजनेसाठी प्राप्त अर्जांच्या पहिल्या यादीचे चावडी वाचन आज (ता. 13) जिल्ह्यातील सर्व शहरी व ग्रामीण भागात करण्यात आले. यामध्ये अर्जदाराचे नाव, त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची माहिती देण्यात आली. जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी या चावडी वाचन उपक्रमाला भेट दिली.