जगन्नाथांच्या टायपोग्राफी कलेची अनोखी निर्मिती; 'जय जगन्नाथ' शब्दातून साकारली आकर्षक कलाकृती
रथयात्रा उत्सवानिमित्त प्रा. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी आपल्या सर्जनशीलतेचा अनोखा आविष्कार सादर करत भगवान जगन्नाथांची आकर्षक टायपोग्राफी कलाकृती साकारली आहे. या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण चित्र हे "जय जगन्नाथ" हा शब्द तब्बल एक हजार वेळा लिहून तयार करण्यात आले आहे.
भक्ती, कला आणि कल्पकतेचा सुंदर संगम असलेल्या या कलाकृतीने कला रसिकांसह भाविकांचेही लक्ष वेधून घेतले आहे. रथयात्रा उत्सवाच्या पावन निमित्ताने भगवान जगन्नाथांप्रती श्रद्धा व्यक्त करण्याचा हा एक अभिनव आणि प्रेरणादायी प्रयत्न असल्याचे प्रा. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी सांगितले.
या अनोख्या टायपोग्राफी कलेचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, धार्मिक भावनेला कलात्मक अभिव्यक्तीची जोड देणारी ही कलाकृती अनेकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत आहे.
Kalyan, Thane | Jul 16, 2026