अकोला: निमवाडी गणेश घाट स्वच्छतेची निलेश देव मित्र मंडळा ची मनपा आयुक्तांना निवेदनातून मागणी
Akola, Akola | Nov 2, 2025 अकोला : अॅड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्प व निलेश देव मित्र मंडळ, अकोला यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत निमवाडी गणेश घाटावरील विसर्जनानंतर राहिलेल्या मूर्ती, सजावट व प्लॅस्टिक कचऱ्याची तातडीने स्वच्छता करण्याची मागणी केली. तसेच न विसर्जित राहिलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीचे अमोनियम बायकार्बोनेट द्रावण वापरून पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात यावे, पुढील वर्षांपासून ही पद्धत नियमित लागू करावी, अशीही मागणी करण्यात आली.अशी माहिती दिनांक 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अॅड