संगीताची वारी कार्यक्रम उत्साहात संपन्न!
आषाढी वारीच्या भक्तिमय वातावरणात सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने आयोजित ‘संगीताची वारी’ या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे ठरले. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत आणखी वाढली.
कविता राम, वर्षा एखंडे, प्रतीक सोलसे आणि राज नारायण यांच्या सुमधुर सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भक्ती, संगीत आणि मनोरंजनाचा सुंदर संगम असलेला ‘संगीताची वारी’चा अविस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न.
53 views | Solapur, Maharashtra | Aug 23, 2026