हवेली: हडपसरच्या उड्डाणपुलावर मनपाचा पीकअप टेम्पो ड्रॉयव्हरविना उलटा सुसाट; सुदैवाने जीवितहानी नाही
Haveli, Pune | Aug 6, 2024 हडपसर भागात असलेल्या वैदूवाडी उड्डाणपुलावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे मनपाच्या रस्ते देखभाल आणि दुरुस्तीची पिकअप टेम्पो रिव्हर्स विनाचालक सुसाट सुटला आहे.या घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.हा रिव्हर्स जाणारा टेम्पो डिव्हायडरला धडकल्याने मोठा अनर्थ टळला.