पोलादपूर: कोकणात अवकाळीचा इशारा
भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) मुंबई प्रादेशिक केंद्राकडून प्राप्त अधिकृत अहवालानुसार, पुढील पाच दिवस म्हणजेच २० मे ते २४ मे २०२६ या कालावधीत कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये हवामानात मोठा बदल होणार आहे. दक्षिण व मध्य कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर कोकणात मात्र हवामान मुख्यत्वे कोरडे राहण्याचा अंदाज आहे.