हिंगणघाट: गिरड शेतशिवारात विज पडुन बैलाचा मृत्यू:शेतकरी थोडक्यात बचावला :शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांचे नुकसान
गिरड:ऐन शेतकऱ्यांच्या हंगामात पोळ्याच्या अवघ्या तीन दिवसापूर्वी शेतात चरत असलेल्या बैलाचा विज पडुन दुर्दैवी मृत्यू झाला.यावेळी शेतकरी असलेल्या शेतकरी सुदैवाने थोडक्यात बचावला. गिरड परीसरात विजेच्या गडगडासह पाऊसाला सुरूवात झाली यावेळी गिरड येथील शेतकरी जिवन मारोती कापसे यांचे वडील मारोती कापसे शेतात बैल चारत असताना अचानक एका बैलाचा मृत्यू विज पडुन दुर्दैवी मृत्यू झाला बाजूला असलेले शेतकरी मारोती कापसे व एक बैल सुदैवाने थोडक्यात बचावला ऐन शेतीच्या हंगामात बैलाचा मृत्यू झाला.