हिंगणघाट: झाशी राणी चौकात शिवसेना उबाठा पक्षाचे खड्ड्यात बसून आंदोलन; खड्डे बुजवण्यासाठी सात दिवसाचे अल्टिमेटम
हिंगणघाट शहरातील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने झाशी राणी चौकात अनोखे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष खड्ड्यात बसून खड्डे मुक्त हिंगणघाटची जोरदार मागणी केली. या आंदोलनामुळे परिसरात मोठी गर्दी झाली आणि नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. आंदोलनादरम्यान शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, सात दिवसांच्या आत शहरातील खड्डे दुरुस्त करावे