जाफराबाद: टेंभुर्णी गावासह जाफराबाद तालुक्यात 4 दिवसानंतर आकाश झाले निर्मळ शेतकरी व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
आज दिनांक पाच एप्रिल 2024 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास टेंभुर्णी गावासह जाफराबाद तालुक्यात व परिसरात 4दिवसानंतर आकाश निर्मळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे, कारण मागील चार दिवसापासून टेंभुर्णी गावासह जाफराबाद तालुक्यात अवकाळी पावसाने वादळी वाऱ्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले होते आणि आज वातावरणात निर्मळ व आभाळ सुद्धा निर्मळ झाल्याचे पाहायला मिळाले असून, यामुळे जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी गावातील नागरिकांनी सुटकेच स्वास सोडला आहे.