जाफराबाद: गाढेगव्हाण येथे कैलास गिरी यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणी गोसावी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी
आज दिनांक 28 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील गाढे गव्हाण येथे गोसावी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व मराठा उपाध्यक्ष सुनील भारती यांनी 20 जून रोजी कैलास गिरी यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला त्या ठिकाणाची पाहणी करत परिवाराशी संवाद साधला आहे, यानंतर त्यांनी टेंभुर्णी येथे पोलीस अधीक्षक यांच्याशी सुद्धा संवाद साधत परिवाराला न्याय देण्याची मागणी केली आहे. तर वैद्यकीय अहवाल आल्यावर योग्य कारवाई करू असे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.