कर्जत: नेरळमध्ये घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची दुरवस्था
Karjat, Raigad | May 5, 2026 नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकी असेलल्या जमीन क्षेत्रात नेरळ विकास संकुल प्राधिकरणाअंतर्गत दोन कोटीचा निधी खर्च करून घनकचरा प्रकप्ल हा उभारण्यात आला, मात्र एक वर्षात सदर घनकचरा प्रकल्प हा बंद पडला आहे. या प्रकल्पामध्ये कचऱ्यावरील प्रकीया बंद असताना, टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचा ढीग हा वाढत आहेत. सध्या या घनकचरा व्यवस्थापण प्रकल्पाची सध्या पूरती दुरावस्था झाली आहे. तर या घनकचरा प्रकल्पातील असलेली बेलींग मशीन अदृश्यस्थितीत आहे.