आरोग्य विभाग जळगाव
जनहितार्थ प्रसिद्ध
653 views | Jalgaon, Maharashtra | Jun 24, 2026 **२८ जून २०२६ रोजी **संपूर्ण जळगाव जिल्ह्यात पल्स पोलिओ मोहीम – ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब अवश्य पाजावेत आरोग्य विभाग, जिल्हा परिषद जळगाव यांच्या वतीने रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात येणार असून, कोणतेही बालक या लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.