📢 अमरावती ग्रामीण पोलीस - तक्रार निवारण दिवस 🚨
नागरिकांच्या समस्या आणि तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस घटकांतर्गत प्रत्येक शनिवारी सर्व पोलीस स्टेशनमध्ये 'तक्रार निवारण दिवस' आयोजित करण्यात येत आहे.
या अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री. निकेतन कदम (भा.पो.से.) हे पोलीस स्टेशन चिखलदरा येथे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. दत्ता तोटेवाड हे पोलीस स्टेशन पथ्रोट येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेणार आहेत व त्यावर तात्काळ कार्यवाही करणार आहेत. तसेच संबंधित विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) देखील उपस्थित राहतील.
नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून आपल्या समस्या व तक्रारी मांडा आणि या मोहिमेचा लाभ घ्या.
Amravati Rural Police आपल्या सेवेत सदैव तत्पर!
🚨 तातडीच्या मदतीसाठी नेहमी लक्षात ठेवा:
📞 आपत्कालीन पोलीस मदतीसाठी डायल करा: 112
💻 सायबर फसवणुकीची: 1930
#AmravatiRuralPolice
#GrievanceRedressalDay
#TakrarNivaranDivas
#MaharashtraPolice
#CyberSecurity
Amravati, Maharashtra | Jul 3, 2026