₹1.53 कोटींची चोरीची शिवशाही बस जप्त | आंतरराज्य बस चोर राजापेठ पोलिसांच्या ताब्यात.
मरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनच्या बीट मार्शल व डी.बी. पथकाने तात्काळ कारवाई करत ₹1.53 कोटी किंमतीची चोरीची शिवशाही बस जप्त केली असून आंतरराज्य बस चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला ताब्यात घेतले आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे नांदा मार्केट, राजापेठ परिसरातून चोरीची शिवशाही बस (क्र. MH-49 BZ-8258) जप्त करण्यात आली. यावेळी बस चोरणारा आरोपी विष्णू गणपती नीलावर (वय 23 वर्ष, रा. रंगारेड्डी, तेलंगणा) यास ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान आरोपीने 01 जुलै 2026 रोजी नागपूर येथील इमामवाडा बस स्थानकातून ही बस चोरी केल्याची कबुली दिली. तसेच तेलंगणा, हैदराबाद, आंध्र प्रदेश आणि नांदेड परिसरातून आतापर्यंत सुमारे 20 बसेस चोरी केल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
आरोपी चोरी केलेल्या बसमधील बॅटरी, टायर व इतर सुटे भाग विकून उर्वरित बस टाकून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
सदर आरोपी व जप्त बस पुढील तपासासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. राकेश ओला, मा. पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२) श्री. श्याम घुगे तथा मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. उमेश मुंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, बीट मार्शल पथक व डी.बी. पथकाने
यशस्वीरीत्या पार पाडली.
@dgpmaharashtra
#rajapethpolice
#AmravatiCItyPolice
Amravati, Maharashtra | Jul 2, 2026