ताम्हिणी घाटातील महिलेच्या हत्येचा २४ तासांत उलगडा! दोघांना अटक; फिरण्याच्या बहाण्याने नेलं अन्...
रायगडच्या ताम्हिणी घाटातील दरीत अज्ञात महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. या हत्याकांडाचा रायगड पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे. 🚨
२५ ऑगस्ट रोजी माणगाव-पुणे मार्गावरील कोंडेथर गावाच्या हद्दीत रस्त्यालगतच्या दरीत २५ ते ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. शवविच्छेदनात महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे मृत महिलेची ओळख सुमन गोपाळ यादव, रा. चिखली, पुणे, मूळ उत्तर प्रदेश अशी पटली.
तपासादरम्यान दुर्गाप्रसाद मंगला प्रसाद प्रजापती आणि दिनेश कुमार विश्राम प्रजापती या दोघांना पिंपरी-चिंचवड परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
पोलिसांच्या माहितीनुसार, फिरण्याच्या बहाण्याने सुमन यांना ताम्हिणी घाटात नेण्यात आले आणि ओढणीने गळा आवळून हत्या केल्यानंतर मृतदेह दरीत फेकण्यात आला.
#TaminiGhat #TamhiniGhat #RaigadPolice #Mangaon #Raigad #Pune #CrimeNews #MurderCase #MaharashtraNews #PoliceInvestigation #BreakingNews #LatestNews #CrimeNewsIndia #ViralNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 28, 2026