‘ढोल-ताशांवर कठोर निर्णय नको!’ मुरलीधर मोहोळांच्या पोलिसांना सूचना; प्लाझ्मा-प्रेशर माईकवर बंदीची मागणी
गणेशोत्सवातील पारंपरिक ढोल-ताशा वादनाला खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
‘ढोल-ताशांवर कठोर निर्णय घेऊ नका,’ अशी सूचना त्यांनी पोलिसांना केली आहे. मात्र, कर्णकर्कश आवाजाला विरोध करत साऊंड मर्यादित ठेवूनच वादन करा, असं आवाहन मोहोळ यांनी केलं.
गणेशोत्सवातील पारंपरिक वादन आणि सांस्कृतिक परंपरा जपताना ध्वनीप्रदूषणालाही आळा घालण्याची गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, प्लाझ्मा आणि प्रेशर माईकवर बंदी घालण्याची मागणी मोहोळ यांनी केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ध्वनीप्रदूषण आणि पारंपरिक वादनाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 👀
‘ढोल-ताशांवर कठोर निर्णय नको!’
मोहोळांच्या पोलिसांना सूचना; साऊंड मर्यादित ठेवा!
पारंपरिक ढोल-ताशांना मोहोळांचा पाठिंबा!
प्लाझ्मा-प्रेशर माईकवर बंदीची मागणी!
#MuralidharMohole #Ganeshotsav #GaneshUtsav #DholTasha #Pune #PuneNews #NoisePollution #GanpatiFestival #GaneshFestival #MaharashtraNews #PoliticalNews #BreakingNews #LatestNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 28, 2026