🚨 मुंबईत महाराष्ट्र FDA ची मोठी कारवाई!
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील १० आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत.
यामध्ये स्विगी इन्स्टामार्टच्या डार्क स्टोअरचा आणि ॲमेझॉनशी संबंधित गोदामाचा समावेश आहे.
FDA च्या तपासणीत स्विगीच्या डार्क स्टोअरमध्ये जिवंत उंदीर, कुरतडलेल्या तांदळाच्या गोण्या, विष्ठा आणि झुरळे आढळल्याचे सांगण्यात आले. तर ॲमेझॉनशी संबंधित गोदामात सांडपाणी, अपुरी स्वच्छता आणि नाशवंत खाद्यपदार्थांच्या तापमान नोंदींचा अभाव आढळल्याचे FDA ने नमूद केले.
दरम्यान, सणासुदीच्या काळातील FDA मोहिमेत राज्यभरात सुमारे ३२,०२३ किलो/लिटर संशयित भेसळयुक्त किंवा अस्वच्छ खाद्यपदार्थ जप्त अथवा नष्ट करण्यात आले असून, त्याची किंमत सुमारे ₹१.३६ कोटी आहे.
📍 मुंबई | महाराष्ट्र
📰 Times of Maharashtra News
तुमच्या मते खाद्यपदार्थांच्या ऑनलाइन डिलिव्हरीपूर्वी अशा तपासण्या अधिक कडक व्हायला हव्यात का? कमेंटमध्ये सांगा.
#MaharashtraFDA #FDA #MumbaiNews #MaharashtraNews #SwiggyInstamart #Swiggy #Amazon #FoodSafety #FoodHygiene #FDAAction #Mumbai #Maharashtra #FoodAdulteration #BreakingNews #MarathiNews #MarathiNewsUpdate #MaharashtraNewsUpdate #MumbaiUpdates #TimesOfMaharashtra #TimesOfMaharashtraNews #NewsUpdate #LatestNews #IndiaNews #FoodSafetyIndia
Pune City, Pune | Sep 23, 2026