Audi आणि Glanzaची भीषण धडक! रस्त्याच्या मधोमध उलटली Audi, VIDEO व्हायरल
ग्रेटर नोएडाच्या बिसरख परिसरातील १३० मीटर रोडवर Audi आणि Glanza कारची जोरदार धडक झाल्याची घटना समोर आली आहे. धडकेनंतर Audi रस्त्याच्या मधोमध उलटल्याचे सांगितले जात आहे.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित वाटसरूंनी एकत्र येत उलटलेली Audi सरळ करण्यासाठी मदत केली. या अपघातात दोघे जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.
घटनेचा VIDEO सोशल मीडियावर समोर आला असून, अपघातानंतर रस्त्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, याची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
🚨 Audi-Glanzaची भीषण धडक; Audi रस्त्यावर उलटली!
😱 १३० मीटर रोडवर भीषण अपघात
🎥 उलटलेली Audi पाहून वाटसरू मदतीला धावले
⚠️ अपघातात दोघे किरकोळ जखमी
#GreaterNoida #Bisrakh #GreaterNoidaNews #Audi #Glanza CarAccident RoadAccident ViralVideo UPNews BreakingNews
Pune City, Pune | Sep 23, 2026