पोलादपूर: वाढत्या उष्णतेमुळे मातीच्या माठांना मागणी
एप्रिल-मे महिन्याच्या वाढत्या उष्णतेमुळे रायगडकर पारंपरिक उपायांकडे वळताना दिसत आहेत. थंडगार पाण्यासाठी मातीचे माठ, सुरई आणि आकर्षक डिझाईनच्या मातीच्या बाटल्यांची मागणी शहरात वाढली आहे. विविध भागांतील मातीच्या वस्तू विक्री केंद्रांवर ग्राहकांची गर्दी वाढत असून, विक्रेत्यांनाही यंदा चांगली कमाई होत आहे. साध्या माठापासून ते नक्षीकाम केलेल्या रंगीबेरंगी बाटल्यांपर्यंत अनेक पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.