जळगाव: सोशल मीडियावरील 'शिवीगाळ' नडली; बेदम मारहाणीत समता नगरातील तरूणाचा मृत्यू; नातेवाईकांचा रास्तारोको आंदोलन
जळगाव शहरातील समता नगर परिसरात राहणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला इंस्टाग्रामवर शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ अपलोड केल्याच्या रागातून दोन जणांसह सहा ते सात अनोळखी व्यक्तींनी बेदम मारहाण केली. या जीवघेण्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय समोर मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत रास्ता रोको आंदोलन केले.