सतर्क राहा, डेंग्यू आणि हिवतापापासून (मलेरिया) स्वतःचा बचाव करा.
छोटासा डास पण देऊ शकतो मोठा त्रास! पावसाळ्यात साचलेले पाणी डासांच्या उत्पत्तीला निमंत्रण देते. आपल्या परिसरातील पाणी साचू देऊ नका आणि आरोग्यदायी गोंदियासाठी साथ द्या.
895 views | Gondia, Maharashtra | Apr 27, 2026 ✅ घरातील कुलर, कुंड्या आणि टायरमध्ये पाणी साचू देऊ नका. ✅ झोपताना मच्छरदाणीचा वापर करा. ✅ ताप आल्यास अंगावर न काढता त्वरित सरकारी रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी करा. घोषवाक्य: "माझं गाव, आरोग्य संपन्न गाव... मलेरिया मुक्त होणारच गाव!"