जाफराबाद: येवता गाव परिसरात दारूची विनापरवाना वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या,1लाख 83हजाराचा मुद्देमाल जप्त
आज दिनांक 14 जून 2026 वार रविवार रोजी रात्री 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील येवता येथे कालिका माता मंदिर परिसरामधून दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांनी काल दिनांक 13 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास बेड्या ठोकले आहे त्यांच्या ताब्यातून रॉयल स्ट्रॉंग ब्रांडच्या 180 ml च्या 474 वाटल्या व एक बजाज मोटरसायकल जप्त करत विष्णू ब्राह्मणे आणि विशाल ब्राह्मणे या दोघांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे,सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या नेतृत्वात झाली.