शहरात आज खाटू श्याम बाबांच्या 'निशान यात्रे'चा उत्साह मोठ्या थाटामाटात पाहायला मिळाला. ही भव्य शोभायात्रा स्थानिक राम मंदिर येथून ' काढण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'जय श्री श्याम'च्या जयघोषात निघालेली ही यात्रा शहराच्या प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत कलमना रोडमार्गे नंदनवन येथे प्रस्थान करणार आहे.शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविकांच्या हातातील 'निशान' होते.