जाफराबाद: टेंभुर्णी येथे शेतकऱ्यांच्या शेती मशागतीच्या कामांना आला वेग
आज दिनांक 30 मे 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथे शेत शिवारामध्ये शेतकरी राजा शेती मशागतीचे कामे करत असल्याचे पाहायला मिळाले आहे, कारण मागील काही दिवसापासून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी डिझेल मिळत नव्हते त्यामुळे हे कामे खळंबली होती मात्र आता सुरळीत मिळत असल्यामुळे शेतकरी राजा ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेती मशागतीचे कामे करत असल्याचे चित्र जाफराबाद तालुक्यात पाहायला मिळत आहे.