धुळे: बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरात अवैधरित्या शालेय वाहतूक करणाऱ्यां वाहनांवर धडक कारवाई
Dhule, Dhule | Aug 30, 2024 बदलापूर येथील शाळकरी मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे शालेय मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, शाळकरी मुलांना ने आण करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रिक्षा,व्हॅन मध्ये सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची तपासणी मोहीम धुळे जिल्हा पोलीस प्रशासनतर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशावरून केली जात आहे, आज शुक्रवारपासून जिल्ह्याभरात अवैधर रित्या शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.